फ्रंटलाइन वर्कर आहात? लस घेण्यासाठी सरकारी रुग्णालयातच जा कारण...

 order front line workers to take covid-19 vaccine government hospitals not private hospital
order front line workers to take covid-19 vaccine government hospitals not private hospital
Updated on

पुणे : तुम्ही आरोग्य सेवक असा की फ्रंटलाइन वर्कर, लस घ्यायची असेल तर थेट सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्राचा रस्ता धरा, असा नवीन आदेश सरकारने दिला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांचा दरवाजा या दोन घटकांसाठी बंद झाला आहे. देशात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना यात प्राधान्य दिले. त्यापाठोपाठ जवळपास महिन्याभरानंतर फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण सुरू झाले. त्यात पोलिस कर्मचाऱ्यांपासून ते बँकिंग क्षेत्रापर्यंतचा त्यात समावेश केला. आता तीन महिन्यांनंतर या दोन्ही क्षेत्रातील बहुतांश जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. यापुढे आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्करची नव्याने नावनोंदणी बंद केली आहे. या दोन्हीतील डोस न मिळालेल्यांसाठी फक्त सरकारी रुग्णालयांमधील केंद्रांवर सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडे सादर करण्याची सूचना प्रसिद्ध पत्रकात दिली आहे.

हेही वाचा - आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची सोडत बुधवारी होणार जाहीर

या नवीन आदेशामुळे खासगी रुग्णालयांमधील केंद्रांवर गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेता आली नाही. फ्रंटलाइन वर्कर साकेत देशमुख म्हणाले, ‘‘लस घेण्यासाठी खासगी रुग्णालयात गेलो. तेथे फ्रंटलाइन या वर्गातून लस घेता येणार नसल्याचे सांगितले. वयाची ४५ वर्षे ओलांडलेली नाहीत आणि फ्रंटलाइनमधूनही लस मिळत नाही अशी अवस्था आता झाली आहे.’’


हेही वाचा - पुणे विद्यापीठातील विशेष प्राध्यापकांची नियुक्ती रद्द करा; कुलगुरूंकडे मागणी

याबाबत सार्वजनिक आरोग्य खात्याचे पुणे परिमंडळाचे सहायक संचालक (वैद्यकीय) डॉ. संजय देशमुख म्हणाले, ‘‘आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्करला कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेण्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये जावे लागेल. त्याचवेळी त्यांच्याकडे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. त्या बाबतचा स्वतंत्र अर्ज तयार केला आहे. हा अर्ज को-व्हिन ॲपवर अपलोड करून त्यांना लस घेता येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com