एका संशयिताचा मृत्यू आणि दोघांना लागण बाबत चौकशीचे आदेश

District Council Chief Executive Officer orders to esquire about death of one due to corona and two infected
District Council Chief Executive Officer orders to esquire about death of one due to corona and two infected
Updated on

वेल्हे / खडकवासला(पुणे) : कोरोनाचा संकर्मण वाढू नये म्हणून संचारबंदी, आरोग्यसंदर्भात उपाययोजना गाववाड्या वस्त्यांवर सुरू आहेत. तरी देखील ग्रामीण भागात एका संशयिताचा मुत्यू व दोघांना कोरोनाचा लागण झाली. याची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद यांनी आज बुधवारी त्यांनी संबंधित महसूल व पोलीस विभागाला दिले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वेल्हे व हवेली तालुक्यातील खडकवासला पानशेत परिसरात एका संशयित व्यक्तीचा मृत्यू आणि दोन जणांना लागण या पार्श्वभूमीवर आयुष प्रसाद यांनी हवेली व वेल्हे तालुक्यातील अनेक गावात जाऊन उपाययोजना यांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यानी हे आदेश दिले आहेत.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 
भोरचे प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदींनी उपाययोजनांची माहिती दिली. पानशेत, खडकवासला भागातील दोन्ही तालुक्यातील गावे बंद केली आहेत. गावोगाव आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य पथके 24 तास तैनात केली असल्याचे प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले.

अगदी रिकामे बसा, पण स्क्रीन टाळा! 
खबरदारी म्हणून मृत व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे. अत्यावश्यक सेवेसह आवश्यक यंत्रणा सज्ज केली आहे. गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही तालुक्यातील प्रशासनाने कठोर अंमलबजावणी सुरू आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com