organ donation
sakal
पुणे - घराच्या छताचे काम करताना उंचावरून पडून गंभीर जखमी झालेल्या अहिल्यानगर येथील २८ वर्षीय तरुणाला उपचारासाठी दाखल केले; मात्र, उपचारादरम्यान तो मेंदूमृत (ब्रेन डेड) झाला. या दुःखाच्या प्रसंगातही त्याच्या कुटुंबीयांनी सामाजिक भान राखून त्याचे अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यामुळे अवयव निकामी झालेल्या पुण्यासह नाशिक जिल्ह्यातील चार रुग्णांना नवे आयुष्य मिळणार आहे.