
Organ Donation
sakal
शिवणे : येथील सचिन कुंडलिक फाफाळे (वय ४६) यांना कामावरून घरी येताना अचानक रक्तदाबाचा त्रास झाला आणि क्षणार्धात कुटुंबात अंधार दाटला. त्यांच्या उपचारासाठी कुटुंबीयांनी मोठी धावपळही केली, जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांकडूनही अथक प्रयत्न सुरू होते, पण नियतीसमोर सगळे हतबल ठरले.