Organic farming : सुदृढ आरोग्यासाठी कुटूंबापुरती विषमुक्त शेती करावी;काऱ्हाटीत जेष्ठांच्या स्नेह मेळाव्यात निघालेला सूर

पुढील पिढीला जुन्या पिढीतील चांगल्या चालीरिती, चांगले संस्कार संक्रमीत व्हावेत.
supe
supe sakal

सुपे - प्रत्येकाने कुटूंबापुरती विषमुक्त शेती करावी ,सुदृढ आरोग्यासाठी लवकर झोपावे, लवकर उठावे. माझी सून माझी लेक, कुटूंब सुखी तर जग सुखी,असा सूर काऱ्हाटी (ता.बारामती) येथील ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात ज्येष्ठांनी व्यक्त केला. येथील यशवंत जीवन प्रेरणा ट्रस्टने या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुढील पिढीला जुन्या पिढीतील चांगल्या चालीरिती, चांगले संस्कार संक्रमीत व्हावेत. या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वयाची सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांचा स्नेह मेळावा व स्नेहभोजनाचे या ट्रस्टने आयोजन केले होते. गाव व परिसरातील सुमारे शंभर जेष्ठ जोडप्यांसह सुमारे साडेतिनशे ज्येष्ठ नागरिक या स्नेह मेळाव्यास उपस्थित होते.

या जेष्ठांमध्ये दोन जण शंभरी पार केलेले होते. श्रीयशवंतराय मंदीर सभागृहात रविवारी (ता.२४) हा कार्यक्रम झाला. दादासाहेब खंडाळे, जनाबाई चांदगुडे यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व जेष्ठांना शाल, टोपी, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

supe
Pune Accident News : पुण्यात भरधाव कारने पाच शेतमजूरांना चिरडलं! तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

कुटूंबात कलह टाळण्यासाठी घरात प्रौढ विचार महत्वाचे आहेत. ग्रामिण भागात आजही एकत्र कुटूंब पद्धतीमुळे संस्कार टिकून आहेत. त्यामुळे अशा कुटूंबातील सदस्यांची मने जोडून राहिली आहेत. सून म्हणजेच लेक आहे असे समजून राहिले तर कुटूंबातील आनंद, शांती टिकून राहते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे. प्रत्येकाने स्वतःच्या कुटूंबापुरतीतरी विषमुक्त शेतीमालाचे उत्पादन केले पाहिजे. असा सल्ला ज्येष्ठ नागरिकांनी बोलताना व्यक्त केला.

supe
Chh. Sambhaji Nagar : खा. इम्तियाज जलील यांच्या पुतळ्यास भरल्या बांगड्या

सुपे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील म्हणाले - देशात सुमारे १३८ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठांचा सन्मान झाला पाहिजे. त्यांच्यासाठी सरकारने वेगवेगळे कायदे केले आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिजे. डॉ. अमोल चांदगुडे यांनी आरोग्यविषयक माहिती दिली. तर कवी हनुमंत चांदगुडे यांनी ज्येष्ठांविषयीच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ज्येष्ठ नागरिक पोपट चांदगुडे, भागुबाई बोबडे, सुशिला जाधव, अंजली जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला.

supe
Nagpur Flood : पुरामुळे दहा हजार घरांचे नुकसान

ट्रस्टचे संचालक रामराव चांदगुडे यांनी प्रास्तावीक केले. याप्रसंगी उपसरपंच रेखा हिरवे, कोंडीबा भंडलकर, ट्रस्टचे पदाधिकारी लक्ष्मण चांदगुडे, गजानन चांदगुडे, विजय चांदगुडे, प्रकाश चांदगुडे, अंकुश भोसले, रवींद्र चांदगुडे, शारदा चांदगुडे, प्रिया चांदगुडे आदी उपस्थित होते. निकिती चांदगुडे, मंजुषा पिसाळ यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com