खडकवासला - विदेशी पर्यटकाबरोबर गैरवर्तन करणाऱ्यांचा तातडीने शोध घ्यावा. आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी. सिंहगड गडाचे पावित्र्य राखण्याची मागणी विविध संघटनांनी केली. हवेली पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.
समाज माध्यमावर व्हिडीओ पाहण्यात आला. न्यूझीलंडचा पर्यटक पायवाटेने सिंहगडावर जात असताना, वरुन खाली उतरणाऱ्या सुमारे १० जणांच्या समुहातील काही तरुणांनी त्याच्या मराठी भाषा अज्ञानाचा फायदा घेत काही घाणेरड्या शिव्या उच्चरायला लावल्या.
तसेच इतरही काही अश्लील शब्द बोलायला लावले. आणि त्याच्या तोंडून येणाऱ्या त्या शब्दांवर ते विकृतपणे हसून, त्याची मजा घेत होते. हा व्हिडीओ मध्ये ही मुलं छत्रपती संभाजीनगर येथील असावीत असे दिसते. त्यांच्या सोबत काही मुलीही दिसत आहेत.
हा न्यूझीलंडचा पर्यट यु ट्यूबर ही आहे. सिंहगडासारख्या ऐतिहासिक, पवित्र ठिकाणी घडलेली ही घटना सम्पूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे, तर भारतालाही बदनामीकारक ठरणारी आहे. हा पर्यटक त्याच्या देशात हा प्रसंग सांगेल तेव्हा किती गैरसमज पसरणार आहेत.
आपल्या देशाबद्दल, याची या तरुणांना कल्पना संस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या शहराजवळच्या पवित्र सिंहगडावर घडलेला हा प्रसंग सर्वच शिवभक्तांमध्ये प्रचंड चीड आणणारा आहे. आज हजरो पर्यटक सिंहगडावर येत असतात. त्यात अशा हौश्या गौश्या, विकृत मनोवृत्तीच्या लोकांमुळे ही पवित्र स्थळं, आपला देश बदनाम होत असतो.
आमची निवेदनद्वारे आपणास नम्र विनंती आहे, की शिवभक्तांचा वाढता रोष लक्षात घेता, या प्रसंगातील सर्वच तरुणांना लकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच सिंहगडावर येणाऱ्या ट्रेक रूटवर अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलीस खात्याचा काही बंदोबस्तही असावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी सर्वप्रथम गड पावित्र्य मोहीम व सिंहगड परिवाराच्या वतीने इतिहास संशोधक डॉ. नंदकिशोर मते, नितीन वाघ, किरण पाटील, ऍड. प्रकाश केदारी, बाळासाहेब मंडलिक, आशिष पार्टे, वेद बुटाला यांनी निवेदन दिले.
शिवसेनेच्या वतीने विभागप्रमुख नितीन वाघ, महेश पोकळे, संघटक तानाजी गाढवे, केतन शिंदे, महेश विटे, कल्पेश वाजे, आकाश कुमावत यांनी निवेदन दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासला मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष विजय मते, चंदन कड, राहुल वाळुंजकर, अंगराज भिसे, बाळासाहेब हनमघर, बाळासाहेब मंडलिक उपस्थित होते.
'राष्ट्रवादी' गडकिल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांनी हवेली पोलिस दिले. प्रदेश उपाध्यक्ष समीर धुमाळ, पश्चिम विभाग अध्यक्ष मनोज भोसले, पुणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.