ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे आयोजन

Online-Job
Online-Job
Updated on: 

पुणे - पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त बेरोजगार युवकांसाठी आजपासून (ता. ३)  राज्यस्तरीय ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या उपक्रमांतर्गत विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या बेरोजगार युवक-युवतींकडून गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. प्राप्त झालेले अर्ज जागा रिक्त असलेल्या संबंधित कंपन्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

येत्या १० जूनला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिन आहे. यंदा लॉकडाऊनमुळे लाखो कामगार आपापल्या मूळ गावी परतले आहेत. या  परप्रांतीय कामगारांच्या स्थलांतरामुळे औद्योगिक कंपन्यांना सध्या  मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. या उपलब्ध परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी राज्यातील युवकांनी रोजगाराची संधी स्वीकारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही गारटकर यांनी केले आहे.

इच्छुकांनी https://forms.gle/xikubng6MBGTpPgp8 या लिंकवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Baner Balewadi Garbage Depot Cleared
 Torna Fort Conservation | Nilesh Lanke Campaign
 Malegaon School Incident | Parents Demand Inquiry
Otur Police Action | Soybean Theft Case