'कुसुमवत्सल्य फाऊंडेशन'च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन

दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाते
pune
punesakal
Updated on

पुणे : 'कुसुमवत्सल्य फाऊंडेशन'च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 'कुसुमवत्सल्य फाऊंडेशन'च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी महिला सशक्तीकरण, पत्रकारिता, सामाजिक कार्य, क्रीडा, शिक्षण, साहित्य, उद्योजक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

वास्तुशास्त्र तज्ञ आनंद पिंपळकर, अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, इतिहास संशोधक भा. ल. ठाणगे, पत्रकार शिवानी खोरगडे, रोहिणी वाजपे, सावित्री जगदाळे, गणपत गादगे, निवेदिता नहार, बाबासाहेब पावसे, शरद मोरे, मनीषा महाजन, कविता मोहरकर, गजानन गुरव, डॉ. अजय तावरे, डॉ. अशोक घोणे, गीता शिंदे, डॉ. सोनिया सावंत, डॉ. जयश्री कर्णिक, निलेश पवार, डॉ. प्राजक्ता कोळपकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन समान करण्यात आला. यावेळी बोलताना 'कुसुमवत्सल्य फाऊंडेशनच्या' संस्थापिका अध्यक्षा सौ. वैशालीताई पाटील म्हणाल्या की, समाजाच्या विकासात भरीव योगदान देऊन मोलाचे काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह देऊन गौरविताना आम्हाला आनंद होत आहे. यापुढेही त्यांच्या हातून असे समाजकार्य घडत राहील ह्यात शंका नाही.

pune
राहुल गांधींचे अकाऊंट 'अनलॉक'; ट्विटर नरमले

पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते, ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. दत्ता कोहिंनकर, डॉ. सौरभी साळवी, दिलीप दादा नवले, आदी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२० च्या विजेत्यांना 'ब्रँड ॲम्बेसेडर' म्हणून निवड करण्यात आली. यामध्ये स्वाती पाटील, शितल बोराडे, दीपा कुलकर्णी, अनामिका ओव्हाळ, सारिका शेठ, मेधा जोशी, जागृती कणेकर, अस्मिता पटेल, कविता मोहरकर, विद्या कोतवाल यांची निवड करून त्यांना कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका देबश्री चक्रवर्ती यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन 'कुसुमवत्सल्य फाऊंडेशन'च्या संस्थापिका अध्यक्षा सौ. वैशालीताई मनोज पाटील यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com