Constitution Day 2023 : पुणे विद्यापीठात संविधानाच्या मुळ प्रतींपैकी एक; डॉ. आंबेडकर, पंडीत नेहरू यांच्या स्वाक्षऱ्या

भारतीय संविधानाच्या पहिल्या काही प्रतींपैकी एक प्रत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात ठेवण्यात आली
Constitution Day 2023
Constitution Day 2023Sakal
Updated on: 

पुणे : भारतीय संविधानाच्या पहिल्या काही प्रतींपैकी एक प्रत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात ठेवण्यात आली आहे. संविधान सभेचे सदस्य आणि विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. मुकुंदराव जयकर यांना मिळालेल्या या दुर्मिळ प्रतिवर संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

विद्यापीठाने या दुर्मिळ ठेव्याचे संवर्धन केले असून, विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या दर्शनी भागातच ठेवण्यात आला आहे.संविधानाच्या मुळ प्रतिबरोबरच काही निवडक प्रतींची निर्मिती करण्यात आली होती. मुळ प्रतीएवढे त्यात कलाकुसर नसली तरी संविधान सभेच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या हे या दुर्मिळ प्रतिचे वैशिष्ट्ये आहे.

ग्रंथालयाचे डॉ. संजय देसले सांगतात,‘‘बॅरिस्टर जयकर जेंव्हा पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. तेंव्हा त्यांनी अनेक पुस्तकांचे दान केले होते. त्यात ही प्रत देखील ग्रंथालयाकडे सुपूर्द करण्यात आली. संविधानाच्या मुळ प्रतींपैकी एक असलेल्या या संविधानावर संविधान सभेच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या देखीस आहे. आमच्याकडे असलेल्या दुर्मिळ ठेव्यांपैकी ही एक प्रत आहे.’’ ग्रंथालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना हा दुर्मिळ ठेवा पाहायला मिळावा म्हणून, मागील चार वर्षांपासून ही प्रत दर्शनी भागात मांडण्यात आल्याचे डॉ. नागेश लोंढे यांनी सांगितले.

संविधानाच्या प्रतिचे वैशिष्ट्ये

- हस्ताक्षरात (कॅलिग्राफी) मध्ये लिहीलेल्या संविधानावर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या

- आशयानुसार काही ठिकाणी चित्रे काढण्यात आली आहे

- निवडक आणि दुर्मिळ संविधान प्रतींपैकी एक

भारतीय संविधानाच्या पहिल्या प्रतींपैकी एक प्रत सावित्रीबाई फुले विद्यापीठात असणे आमच्यासाठी अनमोल ठेवा आहे. या दुर्मिळ ठेव्याचे जतन आणि संवर्धन विद्यापीठ करत आहे. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाला अपेक्षीत असलेली समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रप्रेम रूजविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- डॉ. विजय खरे, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.