

Horror on Highway: ST Bus Skids After Brake Failure, 40 Passengers Safe
sakal
कुरकुंभ : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ (ता. दौंड) परिसरातील मुक्कदमवाडी पुलावर धाराशिव आगाराच्या धावत्या एसटी बसचा अचानक ब्रेक निकामी झाला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून बस थेट दुभाजकावर चढवल्याने मोठा अपघात टळला आणि बसमधील ४० प्रवासी सुखरूप बचावले.