ओबीसी महामंडळातून कर्ज घ्यायचंय?; मग ही बातमी वाचाच

money.jpg
money.jpg
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून 2020-21 या वर्षासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्ह्यासाठी वैयक्‍तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. तसेच, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर दहा लाख पर्यंत वैयक्तिक कर्ज परतावा मिळणार आहे. तसेच 10 ते 50 लाखांपर्यत समकक्ष गटकर्ज व्याज परतावा योजना आहे. या दोन्ही योजना बॅंकांमार्फत राबविण्यात येतील. कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बॅंकेच्या निकषानुसार महामंडळाकडून केला जाईल, वैयक्तिक गट परतावा योजनेसाठी लाभार्थीची (इतर मागासवर्गीय) कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये आहे. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वय 18 ते 50 पर्यंत, कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.

महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य, उमेदवाराने अर्ज करताना यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. बॅंकेचा/वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, कुटुंबातील एका व्यक्तीला एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल. लाभार्थीने कर्ज परतफेड न केल्यास व्याज परतावा दिला जाणार नाही.

अधिक माहितीसाठी ओ.बी.सी. महामंडळ जिल्हा कार्यालयाचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्रमांक बी, सर्वे क्रमांक 104/105, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे अथवा दूरध्वनी क्रमांक 020- 29523059 यावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com