

Armed Robbery Solved: Otur Police Arrest Hardened Criminal from Shrigonda
Sakal
ओतूर : डिंगोरे ता.जुन्नर येथील दत्तवाडी येथे ता.२२ मार्च २०२६ रोजी रात्रीचे सहादु उकीर्डे यांच्या घरात घुसून त्यांना गंभीर मारहाण करून १५,००० रू रोख रक्कम तसेच ५,००० रू किमतीचा मोटरोला कंपनीचा मोबाईल चोरी करून नेला होता, याबाबत त्यांचे नातू अक्षय उकिर्डे यांनी ओतूर पोलिसात अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप आमणे यांच्याकडे देण्यात आला होता.तसेच सदरच्या गुन्हयाचा समांतर तपास ओतूर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्फत चालु होता.