

Udaapur road accident
esakal
ओतूर : रस्ते अपघातात तरुणांचे बळी जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरुवारी उदापूर गावच्या हद्दीत अहिल्यानगर–कल्याण महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ओंकार दिनकर अमूप या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा आणि हेल्मेट वापराच्या महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.