पुणे महापालिकेत समाविष्ट गावात 214 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी केवळ 4 कॅमेरे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV Camera

वर्षभरापूर्वी खडकवासला, किरकटवाडी, नांदेड व नांदोशी-सणसनगर या गावांचा पालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला.

पुणे महापालिकेत समाविष्ट गावात 214 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी केवळ 4 कॅमेरे सुरू

किरकटवाडी - नव्याने पालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या नांदेड, किरकटवाडी, खडकवासला व नांदोशी-सणसनगर या गावांतील तब्बल 214 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी सद्यस्थितीत केवळ चारच कॅमेरे सुरू असून, पालिकेने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने लाखोंचा खर्च करुन बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा अक्षरशः धुळखात पडून आहे. सध्या केवळ किरकटवाडी येथील दोन आणि नांदोशी येथील दोन असे चारच कॅमेरे सुरू असून पालिकेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वर्षभरापूर्वी खडकवासला, किरकटवाडी, नांदेड व नांदोशी-सणसनगर या गावांचा पालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला. त्यापूर्वी काहीच महिने अगोदर या गावांमध्ये लाखो रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. ग्रामपंचायतींकडून वेळोवेळी दुरुस्ती करण्यात येत असल्याने तोपर्यंत काही अपवाद वगळता सर्व कॅमेरे सुरू असायचे मात्र मागील वर्षभरापासून पालिकेकडून सीसीटीव्ही यंत्रणेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी चोरी, घरफोडी, वाहनांमधील पेट्रोल-डिझेल चोरी, वाहनांची तोडफोड अशा घटना घडत असताना सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलीसांनाही तपास करताना अडथळे निर्माण होत आहेत.

गावाचे नाव एकूण कॅमेरे सद्यस्थितीत सुरू कॅमेरे

नांदेड 120 0

किरकटवाडी 60 2

खडकवासला 30 0

नांदोशी 4 2

नांदेड ग्रामपंचायत कार्यालयातील स्ट्रॉंग रुमच उघडली नाही

नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणेसाठी तयार केलेली स्ट्रॉंग रुम मागील वर्षभरापासून पालिकेकडून उघडण्यात आलेली नाही. परिणामी संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा बंद खोलीत धुळखात पडून आहे. खडकवासला येथील सीसीटीव्ही यंत्रणाही अक्षरशः गुंडाळून ठेवण्यात आलेली आहे.

'सीसीटीव्ही सुरू असणे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. गंभीर गुन्ह्यांच्या तपासकामात सीसीटीव्ही फुटेचचा पुरावा खुप उपयोगी पडतो. संबंधित विभागाने बंद असलेले कॅमेरे दुरुस्त करून घ्यावेत.' - भाऊसाहेब ढोले, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी.

'बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने विद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा करून काम करुन घेण्यात येईल.'

- प्रदीप आव्हाड, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे मनपा.

Web Title: Out Of 214 Cctv Cameras In Pune Municipal Corporation Only 4 Cameras Are Operational

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..