पश्चिम हवेलीत भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव अन्...​

rice.jpg
rice.jpg

किरकटवाडी (ता. पुणे) : पश्‍चिम हवेली तालुक्यातील किरकटवाडी, नांदोशी-सणसनगर, खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मालखेड, खामगाव मावळ या व आजूबाजूच्या गावांमधील भात पिकांवर बुरशीजन्य करपा, तपकिरी ठिपके, गुंडाळणारी अळी व ओंबीवरील करपा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तसेच जोरदार पावसामुळे भात पिक जमीनदोस्त झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे.
           

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पाऊस व वादळामुळे अनेक ठिकाणी भाताची पिके भुईसपाट झाली. हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी यावर्षीही अडचणीत आला आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उर्वरित पीकही धोक्यात आले आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे यांच्या सूचनेनुसार तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी शिवाजी खटके, कृषी पर्यवेक्षक वैभव पवार, कृषी सहाय्यक जयश्री वर्पे यांनी पावसामुळे भात शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुणे विभागीय विस्तार केंद्राचे कीडरोग तज्ञ डॉ. रविंद्र कारंडे यांनी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी औषध फवारणी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नांदोशी येथे शेतकरी दिनेश कदम, सरपंच राजेंद्र वाटाणे, किरकटवाडी येथे शेतकरी हिराबाई हगवणे, नरेंद्र हगवणे, गोऱ्हे बुद्रुक येथे सुशांत खिरीड, खानापूर येथे विठ्ठल जावळकर, सरपंच निलेश जावळकर व इतर शेतकरी उपस्थित होते.

नुकसान भरपाई मिळत नसल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी...

दरवर्षी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होते. अधिकारी येतात, पाहणी करून जातात. नुकसानीचे पंचनामेही केले जातात; परंतु शेतकऱ्यांच्या पदरी मात्र काहीच पडत नाही. मदत द्यायची नसेल तर पंचनामा तरी कशाला करायचा, अशी शोकांतिका खानापूर येथील शेतकरी विठ्ठल जावळकर यांनी बोलून दाखवली.

 

"नुकसानीबाबत प्राथमिक पाहणी करून याबाबतचा अहवाल कृषी विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय पातळीवरून आदेश आल्यानंतर महसूल, ग्रामविकास व कृषी विभागामार्फत एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे बांधावर जाऊन पंचनामे करण्यात येतील. ज्या शेतकऱ्यांनी पिकांचे विमे उतरवले आहेत त्यांच्यासाठी विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे."

-शिवाजी खटके, मंडळ कृषी अधिकारी, हवेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com