पुणे : ग्रामीण भागात कोरोना वाढतोय; दररोज पाचशेहून अधिक रुग्णांची पडतेय भर!

Coronavirus_Rural_Area
Coronavirus_Rural_Area
Updated on

पुणे : राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून तब्बल पाच महिन्यांनंतर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. यानुसार मागील तीन दिवसांपासून ग्रामीण भागात दररोज पाचशेहून अधिक नवे रुग्ण सापडू लागले आहेत. दरम्यान, कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.

मागील आठवड्यापासून दररोज पाच हजार जणांची कोरोना चाचणी (कोरोना टेस्ट) करण्यात येत आहे. या चाचण्या वाढल्यानेच रुग्णांची संख्या जास्त दिसू लागली आहे. पूर्वी दररोज तीन हजार चाचण्या घेण्यात येत असत. आता त्या पाच हजार करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी ७९ कोवीड केअर सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत. याशिवाय पाच उपजिल्हा रुग्णालये आणि १९ ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णालयांना सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नुकतेच ५० व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्यात येत आहे. अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठीची वैद्यकीय साधनेही जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्चला पुणे शहरात सापडला होता. तेव्हापासून आजतागायतच्या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकूण १२ हजार ६६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अगदी २२ मेपर्यंत ग्रामीण भागात केवळ ४९ कोरोना रुग्ण होते.

कोरोनाबाबतची संक्षिप्त माहिती

- आतापर्यंत केलेल्या चाचण्या - ४० हजार ८२०.

- एकूण कोरोनाबाधित - १२ हजार ६६.

- कोरोनामुक्त रूग्ण - ८ हजार ६३७.

- रुग्णालयात दाखल रुग्ण - २ हजार ८०७.

-  घरातच उपचार घेणारे रुग्ण - २६३.

- मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या - ३५९.

(टीप : ही आकडेवारी केवळ जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील आहे. यात नगरपालिका क्षेत्रातील रुग्णांचा समावेश नाही.)

नियंत्रणासाठीच्या उपाययोजना

- सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य. 

- मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. 

- ग्रामीण भागातील सर्व सार्वजनिक कार्यक्रम स्थगित.

- गावां-गावातील नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन.

- अंगणवाडीसेविका, आशा स्वंसेविकांमार्फत कुटुंबांचे सर्वेक्षण.

- प्रत्येक आरोग्य केंद्राला दहा दिवसांत प्रत्येकी एक अँब्युलन्स देणार.

- उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय.

- जिल्ह्यात ७९ कोवीड केअर सेंटर्स स्थापन.

- प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून गावा-गावातील परिस्थितीवर नियंत्रण.

- सरपंच, ग्रामसेवकांना प्रशिक्षण. 

- संशयित रुग्ण आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तत्काळ कोरोना चाचणी. 

- उपचारासाठी ५० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले.

- ऑक्सिजन पुरवठा साहित्य उपलब्ध करून देणार.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संशयित रुग्णांच्या टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली दिसते आहे. पण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com