Ganeshotsav 2020 : श्रीमंत दगडूशेठ मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; यंदा उत्सवकाळात मंदिरात एन्ट्री नाही!

Dagdusheth_Mandir_Pune
Dagdusheth_Mandir_Pune

Ganesh Festival 2020 : पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची उत्साहात प्राणप्रतिष्ठापना झाली, पण 'कोरोना'मुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने उत्सवकाळात भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. शिवाय मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही मंदिरात जाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

दगडूशेठ गणपतीची पूजा झाल्यानंतर भाविकांनी मंदिराच्या परिसरात गर्दी केली होती, पण मंदिरातून दर्शन बंद करण्यात आले आहे. भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्वीकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे
भाविकांनी मंदिरावरील आकर्षक विद्युतरोषणाई पाहण्यासोबतच बाहेरूनच दर्शन घेण्यास सुरूवात केली. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी रस्त्यावर थांबण्यास मज्जाव केला. दर्शनासाठी येऊन भाविकांनी गर्दी करू नये, उत्सवकाळात ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

ऋषीपंचमीनिमित्त ऑनलाईन अथर्वशिर्ष पठण
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दरवर्षी हजारो महिला एकत्र येऊन अथर्वशिर्षाचे पठण करतात. यंदा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करता येत नसला तरी हा कार्यक्रम रविवार (ता.२३) सकाळी ६ वाजता प्रातिनिधीक स्वरुपात म्हणजे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ट्रस्टच्या @dagdushethganpati या यूट्यूब चॅनलवर हा सोहळा लाईव्ह होणार आहे.

तसेच घरबसल्या यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि रजिस्टर करण्यासाठी http://dagdushethganpati.com/marathi/rishipanchami-registration-marathi-2020/ या लिंकवर क्‍लिक करावे. गणपतीचे ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या वेबसाईट, ऍप, फेसबुक, यू-ट्यूब, ट्विटर या सोशल मीडिया साईट्सवर व्यवस्था केली आहे. तसेच www.dagdushethganpati.com या संकेतस्थळावर ऑनलाईन दर्शन घेता येईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com