esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

pune

महिला अत्याचाराविरुद्ध ‘आक्रोश’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शहरातील विविध पक्ष संघटनांच्या महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केले. या वेळी केंद्र व राज्य सरकारकडून महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे देण्यात आले.

रेल्वे स्थानकावर दामिनी मार्शलच्या धर्तीवर महिला पोलिस पथक निर्माण करावे, प्रत्येक रेल्वे व बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, रात्री प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करावी व त्यांची तपासणी वारंवार करण्यात यावी, पीडित महिलांच्या मदतीसाठी निर्भया कक्ष उभारण्यात यावा, राज्य महिला आयोगावर तत्काळ नेमणुका कराव्या आदी मागण्याही करण्यात आल्या.

या आंदोलनात बहुजन युवा फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती साठे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संगीता आठवले, नगरसेविका पूजा मनीष आनंद, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी, भीम छावा संघटनेच्या अध्यक्ष निलम गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णा डबाळे निशा सुक्रे आदी उपस्थित होते.

loading image
go to top