Pune Protest NEET Paper leakage case
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - ‘पेपर तुमचा आणि नाहक बळी मात्र विद्यार्थ्यांचा...’ अशा संतप्त शब्दांत भावना व्यक्त करत, पेपरफुटीच्या निषेधार्थ पुण्यात सोमवारी जनक्षोभ उसळला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला खेळ थांबवून शिक्षणव्यवस्थेत तत्काळ पारदर्शकता आणावी, तसेच या ढिसाळ कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री आणि पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हजारो पुणेकर रस्त्यावर उतरले.