esakal | इंदापूर अर्बन सहकारी बँकेची उत्कृष्ट कामगिरी : हर्षवर्धन पाटील IIndapur
sakal

बोलून बातमी शोधा

हर्षवर्धन पाटील

इंदापूर अर्बन सहकारी बँकेची उत्कृष्ट कामगिरी : हर्षवर्धन पाटील

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : इंदापूर अर्बन सहकारी बँकेने कोरोना महामारीत खातेदार व ठेवीदार यांना उत्तम सेवा देवून एनपीएत गेलेल्या कर्जदारांकडून देखील चांगली वसुली केली. त्यामुळे बँक आधारवड ठरली आहे असे मत माजीसहकार मंत्री तथा बँकेचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्‍त केले.

इंदापूर अर्बन बँकेची ९४ वी वार्षिक सर्व साधारण सभा बँक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, उपाध्यक्ष सत्यशील पाटील, माजी अध्यक्ष भरत शहा, मुख्य कार्यकारीअधिकारी विजय तावरे उपस्थित होते.

हेही वाचा: पंजाबमध्ये चाललंय तरी काय? आता CM चन्नी गेले मोदींच्या भेटीला

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, सहकार क्षेत्रा तील बँका व संस्था टिकवण्यासाठी पारदर्शी कारभाराबरोबरच रिझर्व्ह बँकेचे नियमकाटेकोर पणे पाळणे गरजेचे आहे. कर्ज खातेदारांनी घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करूनकर्ज परतफेड करणे गरजेचे आहे. बँकेचे माजी अध्यक्ष भरत शहा, विद्यमान अध्यक्ष देवराज जाधव यांच्यासह सर्वसंचालक मंडळ,कर्मचारी बँकेचे कामकाज पारदशीपणे चालवित असून सभासदांना दहा टक्‍केलाभांश देण्याची त्यांनी तरतूद केली आहे.

बँकेचे अध्यक्ष देवराज पाटील म्हणाले,बँकेस अहवाल सालात ६ कोटी ८४ लाख करपूर्व नफा झाला असून निव्वळ नफा २ कोटी ३५ लाख १६ हजार रुपये झाला आहे.

यावेळी संचालक अँड.रामकृष्णमोरे,अमरसिंह पाटील, विलासराव माने,संदीप गुळवे,अँड. विकास देवकर,दादाराम होळ, आदिकुमार गांधी, लालासाहेब सपकळ, भागवत पिसे, अविनाश कोतमिरे, उज्ज्वला गायकवाड,डॉ. अश्विनी ठोंबरे, उल्हास जाचक,अँड. विजय पांढरे उपस्थित होते. अहवालवाचन बँकेचे मुख्य कार्यकारीअधिकारी विजय तावरे यांनी तर सुत्रसंचालन ज्योतिराम जामदार यांनी केले. आभार प्रदर्शन संचालक अशोक शिंदे यांनी केले.

loading image
go to top