
Pune Bank Recruitment
Sakal
पुणे : ‘‘येत्या काळात बँकेत एक हजाराहून अधिक पदांसाठी भरती होणार आहे. त्यावेळी पुणे जिल्ह्यातील सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यासाठी शक्य तेवढी मदत करू,’’ असे आश्वासन देतानाच ‘‘भरती प्रक्रियेत काही गडबड झाल्याचे कानावर आल्यास अजिबात खपवून घेणार नाही,’’ असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला शुक्रवारी दिला.