
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभागरचनेसाठी आज दिवसभरात एक हजार हरकती-सूचना नोंदविण्यात आल्या. आतापर्यंत दोन हजार ५२७ हरकती व सूचनांची नोंद महापालिकेकडे झालेली आहे. उद्या (ता. ४) शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात हरकती-सूचना नोंदविल्या जाण्याची शक्यता आहे.