
पुणे : झाडणकाम करणारे कर्मचारी शहरातील पुढाऱ्यांचे घरगडी झाले आहेत. अनेक जण मूळ काम सोडून दुसरीकडे काम करत आहेत, तर काही जण कामाला न येता पगार घेत आहेत, अशा प्रकारामुळे रस्त्यावर झाडण्यासाठीचे ४ हजार ३२९ कर्मचारी गायब आहेत. त्यांची गंभीर दखल आयुक्त नवलकिशोर राम यांनी घेतली आहे. त्यांनी यासंदर्भातील अहवाल सादर करा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना दिले आहेत.
झाडणकामातील होणारे गैरव्यवहार, कामगारांची होणारी पिळवणूक ‘सकाळ’ने समोर आणली. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.