
तळेगाव स्टेशन : कुंडमळा येथील साकव पुलाचा वापर फक्त पादचारी आणि दुचाकींस्वारांकडून व्हायचा. या अरुंद पुलावर रविवारमुळे पर्यटकांची गर्दी होती. नदीच्या प्रवाहाच्या ऐन मध्यभागावर ‘सेल्फी’साठी एकवटलेल्या गर्दीमुळे पुलावर ताण येऊन दुर्घटना घडल्याची शक्यता काही प्रत्यक्षदर्शीनी व्यक्त केली.