
पुणे : शहरात झालेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्यांच्या चेंबरमधून पाणी बाहेर पडत होते. पाऊस कमी होऊन चार दिवस उलटून गेले तरी अजूनही रस्त्यावरून दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असून दुचाकीस्वार, पादचाऱ्यांच्या अंगावर हे गटारातील पाणी उडत आहे. मलनिस्सारण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये चेंबर स्वच्छतेवरून हद्दीचा वाद घालून जबाबदारी झटकली जात आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.