पुणे महापालिकेच्या दळवी रुग्णालयात ऑक्‍सिजन बेडचा वापर ‘आयसोलेशन’साठी!

Dalvi-hospital
Dalvi-hospital
Updated on

पुणे - महापालिकेच्या शिवाजीनगरमधील दळवी हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजन बेडचा वापर कोरोना रुग्णांच्या ‘आयसोलेशन’साठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ या संघटनेने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून सुमारे १८० ऑक्‍सिजन बेड या रुग्णालयात निर्माण करून दिले आहेत.

दळवी रुग्णालयात कोविडच्या रुग्णांसाठी ‘क्रेडाई’ने आयसीयुचे दहा आणि ऑक्‍सिजनचे १७० बेड तीन मजल्यांवर उपलब्ध करून दिले आहेत. ऑक्‍सिजन बेडसाठी लागणारी पाइपलाइनही उभारून देण्यात आली आहे. सुमारे पंधरा दिवस काम झाल्यावर २५ जुलै रोजी त्यांनी महापालिकेकडे ते हस्तांतरित केले. ऑक्‍सिजन प्रत्येक बेडपर्यंत पोचविण्यासाठी ‘कन्व्हर्टर’साठी महापालिकेने निविदा मागविल्या. त्यामध्ये सुमारे महिना गेला. त्यामुळे या रुग्णालयात सध्या फक्त आयसीयुच्या बेडचा रुग्णांसाठी वापर होतो. तर ऑक्‍सिजन बेडचा वापर ‘आयसोलेशन’साठी  होत आहे.

विभागीय आयुक्तांचीही ‘जम्बो’कडे धाव 
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या व्यवस्थापनातील त्रुटी पुढे येताच विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी हे सेंटर गाठून उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णांवरील उपचार, त्यासाठीचे डॉक्‍टर, परिचारिका अन्य कर्मचाऱ्यांसह सेवा-सुविधांचा ‘हिशेब’च थोडक्‍यात घेण्यात आला. जम्बो’तील गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर राव यांच्यासह महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी ‘सीओईपी’च्या आवारातील सेंटरची पाहणी केली. ‘कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक असलेल्या सुविधांमधील कमतरता दूर झाली पाहिजे,’’ अशी सूचना राव यांनी या वेळी केली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com