Pune Corona Updates: पुण्यात ऑक्सिजनची मागणी तिपटीने वाढली

Corona_Oxygen
Corona_Oxygen

पुणे : शहरातील ऑक्सिजनचा पुरवठा तीन महिन्यांमध्ये तिपटीने वाढला. सध्या शहरातील रुग्णालयांमधून २५० टनांपर्यंत ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. शहरात डिसेंबरपर्यंत सुरू असलेला कोरोना उद्रेक जानेवारीमध्ये कमी झाला. रुग्णालयांमधील ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या ओसरली. त्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजनची मागणी झपाट्याने कमी झाली. शहरात जानेवारीमध्ये ७५ टन ऑक्सिजनची मागणी होती. ती आता अडीचशे टनापर्यंत वाढली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस.बी.पाटील यांनी दिली.

ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या चार कंपन्या आहेत. त्यांच्या माध्यमातून ३८३ टन ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता आहे. त्यामुळे शहराला ऑक्सिजन पुरवठा कमी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अन्न व औषध प्रशासनाचे सचिव सौरभ विजय आणि आयुक्त अभिमन्यू काळे यांनी या ऑक्सिजन आणि रॅमडेसिव्हिर इंजेक्शन पुरवठ्याबाबत आढावा घेतला. कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी आणि त्यांना वेळेत प्रभावी उपचार करण्यासाठी अत्यावश्यक औषधांचा आणि ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अशी आहे स्थिती
- पुणे जिल्ह्याची ऑक्सिजनची मागणी : १३५ टन
- उत्पादकांकडे शिल्लक ऑक्सिजन साठा : सुमारे ७४० टन

का वाढतेय मागणी?
- पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. तसेच राज्यभरातील इतर कोरोनाबाधित रुग्णही उपचारांसाठी पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. त्यांना ऑक्सिजनवर ठेवावे लागते. त्यामुळे मागणी वाढली आहे.
- व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनवर ठेऊन कोरोनाबाधितांवर प्रभावी उपचार करता येतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे निरीक्षण आहे. त्यामुळे त्यांनी शहरात ऑक्सिजन बेड वाढविण्याची मागणी केली आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com