पुण्यात ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल; 55 मेट्रिक टनांची पहिली खेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen Express arrives in Pune

पुण्यात पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

लोणी काळभोर(Pune) : अंगुलहून (orissa angul) येथून सोमवारी निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस (Oxygen Express) मंगळवारी लोणी(loni) येथील रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. अवघ्या ३७ तासांत १७२५ किमीचे अंतर पार करत ही एक्सप्रेस पुण्यात दाखल झाली. ग्रीन कॉरिडॉरमुळे(Green Corridor) चालक व गार्ड बदलण्यासाठी केवळ काही मिनिटांचा थांबा या एक्स्प्रेसने घेतला होता. ५५ टन ऑक्सिजनची रो-रो सेवेद्वारे चार टँकरची (Tanker) पहिली खेप घेऊन ही एक्स्प्रेस पुण्यात पोहोचली आहे. पुणे विभागातील पहिलीच, तर महाराष्ट्राची (Maharashtra) पाचवी ऑक्सिजन एक्स्प्रेस ठरली आहे. (Oxygen Express arrives in Pune)

ग्रीन कॉरिडॉरमुळे मार्गातील सर्वच सिग्नल ग्रीन ठेवण्यात आले होते, त्यामुळे एक्स्प्रेसचा स्पीड ताशी ५० ते ६० किलोमीटर इतकाच असूनही ग्रीन कॉरिडॉरमुळे वेळ वाचला. दरम्यान, मंगळवारी लोणी रेल्वे स्टेशनवर (ता. ११) रात्री साडेअकरा वाजता ही एक्सप्रेस दाखल झाली. लोणी रेल्वे स्टेशनवर इंजिनच्या शंटिंग लाईनला जोडूनच नव्याने रॅम्पवर ऑक्सिजन एक्स्प्रेस आणण्यात आली. ल्वे प्रशासनासह जिल्हा प्रशासनचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, लोणी एक्सप्रेस दाखल झाल्यानंतर रॅम्पवरील टँकर उतरुन घेण्याआधी चाकांमध्ये हवा भरण्यासाठी काही वेळ गेला. सुरक्षेच्या कारणास्तव रॅम्पवरुन वाहतूक करताना टॅंकरच्या चाकातील हवा काढून टाकली जाते. रेल्वेप्रशासनाने टँकरच्या चाकात हवा भरण्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्था केली होती. 4 कम्प्रेसर होते तसेच कम्प्रेसर रुळांजवळून दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले तर त्यासाठी दोन रिक्षा देखील उपलब्ध होत्या. एका टँकरमध्ये हवा भरण्यासाठी किमान एक तास लागला.

हेही वाचा: गुन्हेगारी नियंत्रणास प्राधान्य : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुण्यातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: Oxygen Express Arrives In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top