esakal | राजीव गांधी रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट

बोलून बातमी शोधा

Oxygen Generation from air Plant at Rajiv Gandhi Hospital
राजीव गांधी रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट
sakal_logo
By
दिलीप कुऱ्हाडे

येरवडा : पर्णकुटी चौकातील राजीव गांधी रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट बसविण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. कोव्हिड केद्रासाठी ८० खाटांचे ऑक्सिजन बेड तर २० खाटांचे व्हेंटिलेटर बेडचीची सोई होणार असून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत बैठक झाल्याची माहिती आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली.

राजीव गांधी रुग्णालयात शुक्रवारी सकाळी महापालिकेचे भवन, बांधकाम आणि विद्युत आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर टिंगरे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ राजीव गांधी रुग्णालय हे वडगावशेरी विभागातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग, प्रसुतिगृह, बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, नवजात अर्भक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) , डायलिसीस, फिजिओथेरीपी, दंतचिकित्सा इत्यादी विभाग आहेत. या रुग्णालयाच्या तीसऱ्या व चौथ्या मजल्यावर शंभर खाटांचे कोव्हिड केंद्र केल्यास ८० खाटांचे ऑक्सिजन तर २० खाटांचे व्हेंटिलेटर बेडची सोई होईल.’’

हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला करणार संबोधित

गांधी रुग्णालयातील दररोज बाह्यरुग्ण विभागात साडेचारशे रुग्ण येतात. राजीव गांधी रुग्णालयात सध्या तीन स्त्रीरोगतज्ज्ञ, दोन बालरोगतज्ज्ञ कायमचे असून राज्य सरकारचे बॉंडेड पाच डॉक्टर आले असून कुटुंबनियोजन, लसीकरण, डायलिसीस, फिजीओथेरपी आदी सुविधा आहेत. यासह या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोना रुग्ण ठेवल्यास इतरांना त्याचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याचा सूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आळवला आहे.

‘‘ राजीव गांधी रुग्णालयात हवेतू ऑक्सिजन निर्मिती प्लांट बसविण्यासाठी सव्वा कोटी रूपयांची आवश्‍यकता आहे. तर इतर मूलभुत सोई-सुविधांसाठी पन्नास ते साठ लाख रूपयांची आवश्‍यकता आहे. येथील कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट भविष्यात रुग्णालयातील इतर विभागांना उपयोगी पडेल.’’

- सुनिल टिंगरे, आमदार

हेही वाचा: भारतात Vi ठरलं सर्वात वेगवान 4G नेटवर्क; Ookla ने केलं शिक्कामोर्तब

ऑक्सिजन प्लांट खराडीतील स्टेडियम मध्ये !

''हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट खराडीतील स्टेडियममध्ये होणाऱ्या तात्पुरत्या कोव्हिड रुग्णालयात बसविण्यासाठी काहीजण आग्रही आहेत. मात्र स्टेडियममध्ये ऑक्सिजन प्लांट नको अशी भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. राजीव गांधी रुग्णालयात बसविणे संयुक्तीक ठरणार'' असल्याचे मत आयुक्तांचे असल्याचे सुनिल टिंगरे यांनी सांगितले.