esakal | पुण्यात रुग्णालयेही ‘गॅस’वर; प्रशासनापुढे संकट
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen supply system disrupted in Pune hospital

शहरातील ऑक्सिजनची मागणी गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. त्यामुळे काही रुग्णालयांमध्ये एक दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. तर, काही शंभर खाटांच्या रुग्णालयांनी त्यांचा ऑक्सिजनचा राखीव साठा वापरण्यास सुरवात केल्याची माहिती मिळाली

पुण्यात रुग्णालयेही ‘गॅस’वर; प्रशासनापुढे संकट

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

पुणे, : कोरोनावर प्रभावी ठरलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची एकीकडे दमछाक होत आहे. त्याच वेळी आता रुग्णालयातील ऑक्सिजनच्या साठ्याची पातळी झपाट्याने कमी झाल्याने शुक्रवारी स्पष्ट झाले. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याचे नवे संकट आता उभे राहिल्याचे दिसते.

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या महिन्याभरापासून झपाट्याने वाढली आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णालयांमधील ऑक्सिजनची मागणी वाढण्यावर झाला आहे. मागणी वाढल्याने ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था विस्कळित झाल्याची माहिती वेगवेगळ्या रुग्णालय व्यवस्थापकांनी दिली. शहरातील ऑक्सिजनची मागणी गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. त्यामुळे काही रुग्णालयांमध्ये एक दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. तर, काही शंभर खाटांच्या रुग्णालयांनी त्यांचा ऑक्सिजनचा राखीव साठा वापरण्यास सुरवात केल्याची माहिती मिळाली. पुढील १२ तासांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होईल, यासाठी या रुग्णालयांमधील व्यवस्थापन सातत्याने वितरकांकडे पाठपुरावा करत असल्याचे चित्र दिसत आहे.

पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमधून पाच हजार ६३७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तसेच, अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. या रुग्णांना ऑक्सिजन अत्यावश्यक आहे. मात्र, मागणी वाढल्याने ऑक्सिजनचा मागणी प्रमाणे पुरवठा होण्यास वेळ लागत असल्याचे रुग्णालयांतर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा: कोरोना संसर्गाशी संग नको! लक्षणे दिसल्यानंतर उशिरा चाचणी बेतू शकते जिवावर

ऑक्सिजनची गरज किती?

पुणे जिल्ह्यासाठी प्रत्येक दिवशी ३५० टन ऑक्सिजनची मागणी आहे. गेल्या वर्षी ही मागणी २७५ टनापर्यंत होती. या मागणी प्रमाणे पुरवठा करताना वितरकांची दमछाक होत आहे. पुण्यात साडेचार हजार ऑक्सिजन बेड आहेत. त्यापैकी डॉ. नायडू, दळवी अशा महापालिकेच्या रुग्णालयांमधूनही ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. यांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.

हेही वाचा: कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

''कोरोनाच्या गेल्या वर्षीच्या उद्रेकापेक्षा यंदा रुग्णांना जास्त ऑक्सिजन लागत असल्याचे जाणवत आहे. कारण, या वेळी ऑक्सिजन जास्त लागणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याचे दिसते.''

- डॉ. सुधीर पाटसुते, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालय

loading image