पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पटेल रुग्णालयात बसविणार ऑक्सिजन टँक

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पटेल रुग्णालयात बसविणार ऑक्सिजन टँक

कॅन्टोन्मेंट (पुणे) : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात एक लाख ४० हजार लीटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक बसविण्यात येणार आहे. त्याव्दारे रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयातील व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त खाटांची ऑक्सिजनची गरज देखील भागणार आहे. साहजिकच जम्बो ऑक्सिजन सिलिंडर विकत घेण्यासाठीचा रुग्णालयाचा होणारा खर्च वाचणार आहे. 

सीएसआर उपक्रमांतर्गत चाकणमधील एका ऑक्सिजन उत्पादक कंपनीतर्फे सरदार पटेल रुग्णालय आणि औरंगाबादमधील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टँक उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली, अशी माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सरदार पटेल रुग्णालयात दहा व्हेंटिलेटरयुक्त खाटांचे दोन आयसीयू विभाग कार्यान्वित केले आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजनयुक्त खाटांची संख्याही वाढविण्यात आली आहे. पुणे शहरात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कोरोना संकटाची तीव्रता वाढली होती. तेव्हा रुग्णालयातील दोन्ही आयसीयूला दिवसाला १२० ते १४० ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासत होती. त्याचबरोबर अन्य ऑक्सिजनयुक्त खाटांसाठीही ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. ऑक्सिजनच्या टंचाईच्या काळात रुग्णालयाला जादा दराने ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करावे लागले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑक्टोबर महिन्यापासून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरचा वापरही नियंत्रणात आला आहे. मात्र, ऑक्सिजन साठवण टँक आणि मध्यवर्ती वितरण यंत्रणा बसविल्यास सिलिंडर विकत घेण्यासाठी होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास रुग्णालय प्रशासनातर्फे व्यक्त केला जात आहे.

बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार म्हणाले की, एका कंपनीचे अधिकार्यांनी आर्मी हॉस्पिटल आणि पटेल हॉस्पीटल मध्ये आले होते. त्यांनी ऑक्सिजन टँक बसविण्याचा प्रस्ताव दिला आहे. संबंधित कंपनीचे अधिकारी पुन्हा एकदा भेट देणार आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com