esakal | अन् मध्यरात्री १२ वाजता उपलब्ध झाला ऑक्सिजन

बोलून बातमी शोधा

oxygen.jpg
...अन् मध्यरात्री १२ वाजता उपलब्ध झाला ऑक्सिजन
sakal_logo
By
अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : मागील दोन दिवसांपासून पुण्यातील अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या कमतरतेपलीकडे जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठीचा ऑक्सिजन पुरवठाही थांबण्याची वेळ आली आहे. अशातच आंबेगावमधील ऑरा हॉस्पिटल व श्वास हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकला नाही. या दोन्ही रुग्णालयात मिळून एकूण ८० रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन कमतरतेमुळे त्यांच्यावर आणीबाणीची परिस्थिती ओढावली होती, अशात स्थानिक नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या प्रयत्नामुळे एका खाजगी कंपनीकडून रुग्णालयांना काल (ता. २०) रात्री १२ वाजता ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध झाले.

काल (ता. २०) ऑक्सजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे शहरातील काही खासगी रुग्णालयात चार-पाच तास पुरेल एवढाच ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंबेगावमधील इलेक्ट्रो ओरीफॅब कंपनीनेकडे इंडस्ट्रीअल कामासाठी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होते. कंपनी मालक सतीश दोशी यांच्याकडे बेलदरे यांनी ऑक्सिजन सिलिंडर हॉस्पिटलला देण्याची विनंती केली. त्यांनीही सध्याच्या परिस्थितीचा विचार करता कंपनीकडे उपलब्ध असणारे ऑक्सिजन सिलिंडर ऑरा हॉस्पिटल आणि श्वास हॉस्पिटलसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही हॉस्पिटलमधील 80 रुग्णांसाठी हा ऑक्सिजन उपलब्ध झाला.

हेही वाचा: मुळा-मुठा नदीचे व्यावसायिक क्षेत्रात रूपांतर कशासाठी ?

हेही वाचा: कामाच्या ठिकाणाजवळ कामगारांच्या लसीकरणास भोसरीमध्ये प्रारंभ

''सध्या शहरात परिस्थिती भीषण आहे. सतीश दोशी यांच्या माध्यमातून हा ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. शासनाकडे एक विनंती राहील. शासनाकडून होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, शहरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियोजन करावे, ही अपेक्षा आहे. ''

- युवराज बेलदरे, स्थानिक नगरसेवक.