पाबळ-कान्हूर मेसाई रस्त्यावर तिहेरी अपघात

पाबळ-कान्हूर मेसाई रस्त्यावर तिहेरी अपघात
Published on

पाबळ, ता. १८ : पाबळ (ता. शिरूर) येथील कान्हूर मेसाई रस्त्यावर सोमवारी (ता. १८) सकाळच्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला; तर पाच जण जखमी झाले.
भास्कर शिवलाल मकवाणे (वय ६०, रा. पाबळ) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. तर आशा बाळू घोलप (रा. घोलपवाडी, कान्हूर मेसाई), दुचाकीस्वार सतीश भाऊसाहेब खैरे ( वय ४२ रा. खैरेनगर), मोटारचालक संभाजी भगवान जाधव (रा.भोरशेत, पाबळ) तसेच गणेश बबन आगरकर व काळूराम तुकाराम चौधरी (रा. पाबळ) असे जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाबळकडून येणारी मोटार (एमएच १२ टी के ३१६९) अचानक विरुद्ध दिशेला गेल्याने समोरून येणाऱ्या रिक्षाला (एमएच १४ ईएच २६५०) जोरदार धडक दिली. त्याचवेळी शेजारून जाणाऱ्या दुचाकीला (एमएच १२ एचएक्स ९४९६) देखील धडक बसली. याप्रकरणी सुधीर सदाशिव मकवाणे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी मोटारचालक संभाजी भगवान जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हवालदार संतोष शेळके करत आहेत.

नशीब बलवत्तर म्हणून माजी उपसरपंच बचावले
अपघातातील दुचाकीस्वार सतीश खैरे हे खैरेनगरचे माजी उपसरपंच आहेत. धडकेनंतर ते रस्त्याच्या कडेला जाऊन आदळले. मोटारीचे चाक त्यांच्या डोक्याजवळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून, नशीब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com