
जुन्नर : संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आज पहाटे (शनिवार ता.२१) काशी विद्वत परिषदेचे प्रभारी विश्वगुरु नामदेव महाराज हरड यांचे हस्ते विधिवत पादुका पूजन व महाअभिषेक संपन्न झाला. यावेळी आचार्यांनी मंत्र घोष केला. वारकरी व संतांचे साक्षीने सोहळा संपन्न झाला. यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने हरड महाराजांना सन्मानित करण्यात आले.