पुणे - दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेले कौस्तुभ गनबोटे व संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये साश्रूनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. गनबोटे व जगदाळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो पुणेकरांनी अंत्ययात्रा व अंत्यसंस्कारासाठी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.