बनावट नाव, पाकिस्तानी पासपोर्ट!

बनावट नाव, पाकिस्तानी पासपोर्ट!
Published on

पाकिस्तानच्या
पासपोर्टधारकास अटक

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : पाकिस्तानात चार ते पाच वर्षे वास्तव्य करून बनावट नावाने पाकिस्तानी पासपोर्ट मिळविल्यानंतर त्याच आधारे भारतात परतलेल्या एका व्यक्तीला हिललाईन पोलिसांनी मलंगगड परिसरातून ताब्यात घेतले. या प्रकरणी पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता ‘मुंबई एटीएस’कडूनही स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे.

अटक केलेल्या व्यक्तीची ओळख पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाही. त्याचा जन्म मलंगगड परिसरात झाला असून, काही वर्षांपूर्वी तो भारतीय पासपोर्टवर पाकिस्तानातील नातेवाइकांकडे गेला होता. तेथे चार ते पाच वर्षे वास्तव्य केल्यानंतर त्याने भारतीय पासपोर्ट नष्ट करून कथितरीत्या बनावट नावाने पाकिस्तानी पासपोर्ट मिळविला. या पासपोर्टच्या आधारे तो भारतात परतला. त्यानंतर त्याने पुन्हा भारतीय पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज केला; मात्र त्याचा पूर्वीचा प्रवास आणि पाकिस्तानी पासपोर्टची माहिती पासपोर्ट विभागाच्या निदर्शनास आली. विभागाने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर हिललाईन पोलिसांनी कारवाई केली. दोन-तीन दिवसांपूर्वी त्याला मलंगगडावरून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पाकिस्तानात वास्तव्य करून आल्याने पोलिसांनी ‘मुंबई एटीएस’लाही याची माहिती दिली. ‘एटीएस’कडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी सध्या ‘एफआयआर’, संबंधित कागदपत्रे आणि आरोपीची ओळख जाहीर करण्यास नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com