Pune News: पालखी सोहळ्याचा पुणे मुक्कामाचा निर्णय समन्वयातून घेणार: ॲड. राजेंद्र उमाप, १३ एप्रिलला अंतिम निर्णय आळंदीत घेतला जाईल!

Rajendra Umap statement on Palkhi route coordination: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुण्यात दोन दिवस मुक्काम कायम; भवानी पेठेतील विठोबा मंदिराची जागा बदलल्याच्या वृत्ताला फेटाळणी, १३ एप्रिलला आळंदीत सर्वानुमते अंतिम निर्णय
Coordination Key for Palkhi Stay in Pune, Final Decision on April 13

Coordination Key for Palkhi Stay in Pune, Final Decision on April 13

sakal

Updated on

आळंदी: ‘‘संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुण्यात दोन दिवस मुक्काम राहणार आहे. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील मुक्कामाची जागा बदलली, असे दिशाभूल करणारे वृत्त पूर्णतः चुकीचे आहे. मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. पालखी विठोबा मंदिरात काही गैरसोयी आहेत. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी, दिंडी समाज संघटना यांच्याशी चर्चा करून सर्वांनुमते १३ एप्रिल रोजी अंतिम निर्णय आळंदीत घेतला जाईल,’’ अशी भूमिका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.३१) मांडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com