
Pune Traffic
Sakal
फुरसुंगी : पालखी महामार्ग अपूर्ण कामाबाबत नेहमीच चर्चेत असतो. सध्या मार्गावर फुरसुंगी ते दिवेघाट या सहाव्या टप्प्यातील अतिशय रहदारी असणाऱ्या भागात काम सुरू आहे. अशातच रस्त्याचे काम संथ गतीने होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. प्रशासनाने या टप्प्यात मनुष्यबळ वाढवून जलद गतीने काम करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
पालखी महामार्गाचे भेकराई नगर ते रेल्वे उड्डाण पूल या टप्प्यातील काम सुरू होऊन जवळपास आठ महिने उलटले आहेत. येथील काम संथ गतीने होत असल्याने उपलब्ध रस्ता कमी आणि वाहनांची संख्या जास्त अशी परिस्थिती झाली आहे. यामुळे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.