
उंडवडी : विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची वाटचाल म्हणजे जिद्द, श्रद्धा आणि भक्तीचे जिवंत रूपच! तब्बल ३० किलोमीटरचा खडतर प्रवास, रोटी घाटाचे अवघड चढण, कधी ढगाळ वातावरण, कधी उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारांनी चिंब झालेले अंग, तरी वारकऱ्यांची पावलं थांबलीच नाहीत.