पाचगणी : पाचगणी पोलिसांची धडक कारवाई: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास २४ तासांत बेड्या!

पाचगणी : पाचगणी पोलिसांची धडक कारवाई: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास २४ तासांत बेड्या!
Published on

​अपहरणप्रकरणी
एकास अटक

​पाचगणी, ता. १८ : लग्नाचे आमिष दाखवून तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचारप्रकरणी पाचगणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. विभास सुतार (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी पीडित मुलीची सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन केले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला २१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. याबाबत मुलीच्या पालकांनी पाचगणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून ​तपासादरम्यान पोलिसांनी छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली आणि संशयिताला ताब्यात घेतले. संशयितावर पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. संशयिताची न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
-------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com