

Pandharpur Corridor land acquisition process begins with consent from 90 property owners.
esakal
पंढरपूर : पंढरपूर कॉरिडॉरसाठी आता भूसंपादन प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. खासगी वाटाघाटी पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ६०२ बाधितांपैकी ९० बाधितांनी जागेचे मोजमाप आणि इतर प्रक्रियेसाठी संमती पत्रे दिली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकीयेन यांनी पंढरपुरात दिली. कार्तिकी यात्रेनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी कॉरिडॉर संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, शासनाचे पॅकेज आणि बाधितांच्या अपेक्षा यातून मध्यमार्ग काढत भूसंपादन केले जाणार आहे