पंढरपूर ते घुमान संत नामदेव महाराज सायकल वारीचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी उदघाटन महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील १६० सायकल रायडर्सचा सहभाग

पंढरपूर ते घुमान संत नामदेव महाराज सायकल वारीचे  उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी उदघाटन  महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील १६० सायकल रायडर्सचा सहभाग
Published on: 

पंढरपूर ते घुमान सायकल
वारीचे शनिवारी उद्‌घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ; १६० सायकलपटूंचा सहभाग

पंढरपूर, ता. १६ : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) अशी सुमारे अडीच हजार किलोमीटरची सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. या वारीचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (ता. २१) येथील शासकीय विश्रामगृह परिसरात होणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे १६० सायकलपटू या वारीत सहभागी होणार असल्याची माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, श्री नामदेव दरबार कमिटी, श्री क्षेत्र घुमान (पंजाब), सायकल रायडर्स असोसिएशन आणि समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या वतीने २०२२ पासून संत शिरोमणी श्री नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात येते. यंदा या वारीचे पाचवे वर्ष आहे.
२१ नोव्हेंबरला सुरू होणारी सायकल वारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाना आणि पंजाब या पाच राज्यांतून प्रवास करून १३ डिसेंबरला श्री क्षेत्र घुमान येथे पोहोचणार आहे. तेथे सायकल वारीचा समारोप होईल. त्यानंतर हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या चार राज्यांतून प्रवास करून २१ डिसेंबरला सायकलवारी श्री क्षेत्र पंढरपूर येथे परतणार आहे.
या पत्रकार परिषदेस पालखी सोहळा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर टेमघरे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, सचिव ॲड. विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, सदस्य राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे, राज्य समन्वयक गणेश उंडाळे आणि सायकल रायडर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र पिसे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.