
पुणे : मुदतीत मिळकतकर भरणाऱ्या आणि कुठलीही थकबाकी नसलेल्या मिळकतकरधारकांसाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या "पंडित दीनदयाळ उपाध्याय विमा योजना' अडचणीत आली आहे. या योजनेसाठी मागील वर्षी नेमण्यात आलेल्या विमा कंपनीची मुदत 27 मे रोजी संपुष्टात आली. नव्याने कंपनी न नेमल्यामुळे क्लेम करू इच्छिणाऱ्या मिळकतकरधारकांच्या वारसाला या योजनेचा लाभ मिळणार कि नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळकतकराचे उत्पन्न वाढावे यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने दोन वर्षांपूर्वी मिळकतकरधारकांचा अपघाती विमा उतरवण्याची योजना लागू केली. "पंडित दीनदयाळ उपाध्याय' यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेमध्ये कुठलीही थकबाकी नसलेल्या मिळकतधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना विमा कंपनीकडून पाच लाख रुपये मदत देण्यात येते. नंतर या योजनेची व्याप्ती वाढवताना मिळकतधारकाच्या कुटुंबातील पती अथवा पत्नीसोबत अविवाहित दोन मुलांचा व नंतर अस्थिव्यंग व घटस्फोटित मुलीच्या मृत्यूनंतरही विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या योजनेला मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विलंब झाला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पूर्वीच्याच विमा कंपनीला मुदतवाढ दिली होती. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर 27 मे रोजी विमा कंपनीला एक एप्रिलपर्यंत पुन्हा मुदत वाढ देण्यात आली. परंतु मागील वर्षाची मुदत 27 मे रोजी संपुष्टात आली. तेव्हा महापालिका प्रशासनाने पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबविली. निविदाही उघडल्या आहेत. मात्र, एक महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप त्यांना वर्कऑर्डरही देण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील दोन महिन्यांत अपघाती मृत्यू झालेल्या मिळकतधारकांच्या वारसांना या विमा योजनेचा लाभ मिळणार कि नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पंडित दीनदयाळ विमा योजनेची निविदा उघडली आहे. परंतु काही तांत्रिक चुकांमुळे अद्याप वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही. लवकरच या त्रुटी दूर करून त्यास मान्यता देण्यात येईल.
-रूबल आगरवाल (अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका)
(Edited by : Sagar Diliprao Shelar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.