Pune News : फर्ग्युसन रस्त्यावर ‘मॉक ड्रील’; दहशत अन॒ वाहतूक कोंडी

FC Road Pune : फर्ग्युसन रस्त्यावर झालेल्या 'बॉम्बस्फोटा'च्या अफवेमुळे घबराट निर्माण झाली होती, पण ती एक मॉक ड्रील असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
FC Road Pune

FC Road Pune

Sakal

Updated on

पुणे : डेक्कन परिसरातील फर्ग्युसन रस्ता... शुक्रवारी (ता. ३) दुपारचे एक वाजलेले... फर्ग्युसन रस्त्यावर अचानक बॉम्बस्फोट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही क्षणांतच रुग्णवाहिका, बॉम्बशोधक व नाशक पथकांसह शस्त्रसज्ज पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला...परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परंतु काही वेळातच हे ‘मॉक ड्रील’ असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले अन॒ नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, या वेळी कर्वे रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com