‘पानिपत’ चित्रपटात ‘पीएनजी’चा साज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

‘पानिपत’ चित्रपटाचे दागिने पु. ना. गाडगीळ आणि सन्सने (पीएनजी) घडविलेले आहेत. चित्रपट व प्रदर्शनानिमित्त औंध येथील वेस्टन सेंटर वन मॉलमधील ‘पीएनजी’च्या दालनास ‘पानिपत’ चित्रपटाची टीम आशुतोष गोवारीकर, क्रिती सेनन, सुनीता गोवारीकर, अर्जुन कपूर यांनी नुकतीच भेट दिली.

पुणे - ‘पानिपत’ चित्रपटाचे दागिने पु. ना. गाडगीळ आणि सन्सने (पीएनजी) घडविलेले आहेत. चित्रपट व प्रदर्शनानिमित्त औंध येथील वेस्टन सेंटर वन मॉलमधील ‘पीएनजी’च्या दालनास ‘पानिपत’ चित्रपटाची टीम आशुतोष गोवारीकर, क्रिती सेनन, सुनीता गोवारीकर, अर्जुन कपूर यांनी नुकतीच भेट दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

‘पीएनजी’चे अध्यक्ष व संचालक अजित गाडगीळ, संचालिका डॉ. रेणू गाडगीळ, सतीश कुबेर, नंदू देवळे, सीएफओ व विक्रीप्रमुख आदित्य मोडक या वेळी उपस्थित होते. गोवारीकर म्हणाले, ‘‘पानिपत’ चित्रपटाचे दागिने हे ‘पीएनजी’शिवाय पूर्ण होऊ शकले नसते. प्रत्येक पात्राला साजेसे दागिने त्यांनी तयार केले.’

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

अजित गाडगीळ म्हणाले, ‘‘चित्रपटाचे दागिने हे महाराष्ट्रीय शैलीबरोबरच उत्तरेकडील शैलीतील असून, दागिन्यांसाठी विशेष संशोधन केले आहे.’’ मोडक म्हणाले, ‘‘प्रदर्शनातील दागिन्यांवरून खरेदीसाठी ऑर्डरही देता येईल.’’ ‘पानिपत’ चित्रपटात वापरलेले दागिन्यांचे प्रदर्शन हॅपी कॉलनी-कोथरूड येथील ‘पीएनजी’च्या दालनात रविवारपर्यंत (ता. ८) आणि सातारा रोड (वाळवेकरनगर) येथील दालनात २२ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panipat movie team in png shop visit