esakal | पानिपत पराभवाचा नाहीतर शौर्याचा इतिहास : गोवारीकर
sakal

बोलून बातमी शोधा

Panipat is not history of defeat it is about gallantry says Gowarikar

आपल्या प्रत्येक शाळेत पानिपत हा पराभवाचा इतिहास नाही, तर शौर्यचा आहे, हे मुलांवर बिंबवा. सदाशिवराव, विश्वासराव हा टिंगलटवाळीचा विषय नाही, ती शौर्यगाथाच आहे, अशी भावना दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केली.

पानिपत पराभवाचा नाहीतर शौर्याचा इतिहास : गोवारीकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आपल्या प्रत्येक शाळेत पानिपत हा पराभवाचा इतिहास नाही, तर शौर्यचा आहे, हे मुलांवर बिंबवा. सदाशिवराव, विश्वासराव हा टिंगलटवाळीचा विषय नाही, ती शौर्यगाथाच आहे, अशी भावना दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे पानिपत चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा सत्कार करण्यात. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, चारुदत्त आफळे, पुणे महानगरपालिकेतील भाजपचे सभागृह नेते धीरज घाटे, संस्थेचे अध्यक्ष अंकित काणे, आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पानिपत या विषयावर आफळे यांचे व्याख्यानही झाले. संस्थेसाठी योगदान देणाऱ्या तरुणांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

गोवारीकर म्हणाले,  "पानिपत चित्रपटाला अनेकांनी विरोध केला. हरियाणा, राजस्थानमध्ये चित्रपटावर बंदी घातली. पण देशभरात हा चित्रपट बघितला गेला पाहिजे. त्या राज्यांमध्येही दूरचित्रवाहिनीवरून नक्कीच दिसेल. त्यावेळी ही राज्ये कशी अडवणार आहेत? हा चित्रपट मी पैशासाठी केलेला नाही. या लढाईला चिकटलेली पराभवाची छटा मला घालवायची होती. हा सिनेमा करताना प्रचंड मोठा घटनाक्रम माझ्याकडे होता; पण सगळा सिनेमात आणू शकलो नाही. कारण मला मराठा साम्राज्य आणि त्याची शौर्यगाथाच दाखवायची होती."

INDvsNZ:श्रेयस अय्यरनं विश्वास सार्थ ठरवला; टीम इंडियाचा दणदणीत विजय

परदेशातील अनेक लढायांवर लिहिले गेले, बोलले जाते. वेगवेगळ्या शतकांतील साम्राज्यांची नावे आपण घेतो. पण अठरावे शतकाकडे आपण पाहात नाही. हे शतक मराठा साम्राज्याचेच होते. हा इतिहास आपण पुढच्या पिढ्यांना सांगितला पाहिजे, असे गोवारीकर म्हणाले.

आफळे म्हणाले, "आजचा समाज व्यक्तीपूजक होत चालला आहे. पक्षाचा नेता, संस्थेचा प्रमुख यांचा कार्यक्रम असेल, तर लोक एकत्र येतात. पण ध्येयासाठी कुणी एकत्र येत नाही. मात्र शिवाजी महाराजांनी ध्येयसाठी एकत्र या ही दृष्टी दिली. स्वराज्यासाठी त्यांनी सर्वांना एकत्र आणले. हेच आपण विसरलो आहोत.

बलकवडे म्हणाले, " पानिपत हा शौर्याचा इतिहास आहे. कारण जिंकता जिंकता आपण शेवटच्या टप्प्यात हारलो. मराठ्यांनी पुढच्या दहा वर्षांत पुन्हा उत्तरभारत ताब्यात घेतला आणि पुढे तीस वर्षे त्यावर राज्य केले, हा इतिहास आहे आणि पानिपतच्या लढाईचा हाच विजयच आहे."