अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या भावावर हल्ला

अभिनेते पंकज त्रिपाठी 
यांच्या भावावर हल्ला
Published on

अभिनेते पंकज त्रिपाठी
यांच्या भावावर हल्ला
पाटणा, ता. २२ (पीटीआय): अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे भाऊ विजेंद्रनाथ तिवारी यांच्यावर जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला झाला. ही घटना गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड गावात रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) सुधांशू कुमार यांनी सांगितले की, विजेंद्रनाथ तिवारी यांच्यावर त्यांच्या मूळ गावी जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला.या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून हल्ल्यात वापरण्यात आलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.तिवारी यांना रविवारी रात्री गोपालगंजमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पाटणा येथील वैद्यकीय संस्थेत हलविण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com