पानशेत धरण खोऱ्यातील पोळे येथील शेतकऱ्याचा वनव्यात होरपळून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panshet Dam farmer from pole farmer death in fire accident in forest velhe pune

पानशेत धरण खोऱ्यातील पोळे येथील शेतकऱ्याचा वनव्यात होरपळून मृत्यू

वेल्हे : पानशेत धरण खोऱ्यातील पोळे गावातील शेतकऱ्याचा वनव्यात आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (ता.०३)रोजी सकाळी ११.३०च्या सुमारास घडली. तुकाराम भाऊ निवंगुणे(वय-६५) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मयत व्यक्ती चा मुलगा नितीन निवंगुणे यांनी वेल्हे पोलीस स्टेशन मध्ये खबर दिली. माहिती देताना नितीन निवंगुणे म्हणाले, 'घराच्या पाठीमागे असलेल्या शेतामध्ये लाकडे घेऊन येतो असे सांगून गेले वडील बराच वेळ घरी न आल्यामुळे मी व माझी आई वडिलांना पाहण्यासाठी गेलो त्यावेळी आमच्या शेताजवळ वनवा लागल्याचे दिसले यामध्ये शोध घेत असताना बांधाच्या खालच्या बाजूस शेतातील वनव्या मध्ये वडील पडलेले आढळले .

वडिलांना घेऊन वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चंद्रकांत भोईटे यांनी तुकाराम निवंगुणे हे ९५% भाजले असल्याने त्यांना मृत घोषित केले. पानशेत परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत असून सुद्धा येथील कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने पानशेत परिसरातील भागातील जनतेला आरोग्यबाबतच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उपचारासाठी वीस किलोमीटर तालुक्याच्या ठिकाणी वेल्हे येथे जावे लागते. रुग्णांवर पानशेत येथे प्राथमिक उपचार झाल्यास जीव वाचण्यास मदत होईल यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसे आरोग्य कर्मचारी डॉक्टर्स उपलब्ध व्हावे अशी मागणी येथील स्थानिक जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी केली आहे. सदर घटनेची चौकशी वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार ,व पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.टी .मोरे व पोलीस नाईक एस. पी. शिंदे करत आहेत.

Web Title: Panshet Dam Farmer From Pole Farmer Death In Fire Accident In Forest Velhe Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top