पानशेतही ओव्हर फ्लो; मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panshet_Dam

रात्री पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातून विसर्ग आणखी वाढविण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.

पानशेतही ओव्हर फ्लो; मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढला!

पुणे : खडकवासला प्रकल्पातील चार धरणांपैकी खडकवासला धरणानंतर सोमवारी (ता.17) सायंकाळी पानशेत धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. या चार धरणांत सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा 25.82 टीएमसी (88.57 टक्के) झाला आहे. 

पानशेत धरणातून दोन हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाण्याचा येवा वाढला आहे. सध्या मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग नऊ हजार 416 क्युसेकने वाढविण्यात आला आहे. रात्री पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातून विसर्ग आणखी वाढविण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.

Ganeshotsav 2020 : पुणेकरांनो, 'श्रीं'च्या विसर्जनाबाबत महापौरांनी केलंय विशेष आवाहन; म्हणाले...​

जिल्ह्यात गतवर्षी ऑगस्टच्या मध्यास बहुतांश सर्व धरणे काठोकाठ भरली होती. परंतु सध्या खडकवासला, पानशेत, कळमोडी, वीर आणि आंद्रा ही पाच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे‌त. इतर काही धरणे जवळपास भरण्याच्या मार्गावर आहेत.
खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत एकूण 25.82 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी 29.15 टीएमसी (शंभर टक्के) पाणीसाठा होता. दिवसभरात टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 32 मिलिमीटर, वरसगाव 30 मिलिमीटर, पानशेत 27 मिलिमीटर आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

Video : राज्यात पावसाची बॅटिंग सुरूच राहणार; हवामान खात्यानं दिलाय इशारा​

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये; कंसात टक्केवारी : 
टेमघर - 2.52 (67.81)
वरसगाव - 10.81 (84.29)
पानशेत - 10.52 (98.82)
खडकवासला - 1.97 (100)

इतर धरणांतील पाणीसाठा
भामा-आसखेड - 5.46 (71.27)
भाटघर - 21.85 (92.94)
नीरा देवधर - 9.63 (82.13)
वीर - 8.67 (93)
डिंभे - 8.96 (71.71)
कळमोडी - 1.51 (100)
आंद्रा - 2.92 (100)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)