Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

Panshet Dam Water Storage Reaches 69% : मुसळधार पावसामुळे पानशेत धरण ६९ टक्के भरले असून खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये १८.३१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुण्याच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
Khadakwasla Dam Project Water Level Update

Khadakwasla Dam Project Water Level Update

esakal

Updated on

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी पानशेत धरणात समाधानकारक पाणीसाठा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे धरण ६९ टक्के भरले आहे. सध्या पानशेत धरणात ७.२७ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर पानशेतसह चारही धरणात मिळून आतापर्यंत १८. ३१ टीएमसी इतका पाणीसाठा झाला (Khadakwasla dam water storage) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com